Door Step School

Annual Exhibition by Parivartan Training Center – Comprehension 2017

Door Step School’s Parivartan Training Center organized their annual exhibition, based on the theme of ‘Comprehension, from 1st to 10th of February 2017. It was held at Annabhau Sathe School on Kumathekar Road, Pune.  This was the seventh successful year of the exhibition. Theme for last year’s exhibition was ‘Multiple Intelligence’.

Learning is a continuous process. Also, comprehension and intellect go hand in hand. These two fundamental goals were considered centrally while designing this year’s exhibition. How children can grasp better with school’s teaching methodologies and which educational aids can be used for achieving better understanding for children… These points were considered while explaining various concepts of different subjects.

Comprehension, being a vast concept pertaining to brain functioning, was explained in the exhibition with help of theory as well as other aids. The theory consisted of history before dawn of ‘Study of Comprehension’ and the journey till ‘how to achieve better learning through comprehension theories’. This was illustrated with the help of many examples, diagrams, drawings as well as few poems based on concepts of comprehension. While arranging the display of comprehension concepts, various subjects such as languages, mathematics, sciences, geography, social sciences were touched upon considering children’s age. Since emotions also carry impact on comprehension of children, this aspect was as well considered while preparing educational aids.

The exhibition was visited by Door Step School staff from all projects, representatives of other NGOs, dignitaries from Government Education Department, teachers and students from Municipal Corporation, Zilla Parishad, and private schools. Around 1,260 visitors were registered during the span of 10 days of this event. The event was received well and response was positive.

Looking at the written as well as face-to-face feedback from visitors, a common opinion was heard that “The comprehension concepts and overall theme were well explained in simple and easy manner, with help of various tools and charts.” We are satisfied that we could illustrate the topic of comprehension convincingly to the large number of visitors.

Few chosen feedbacks from all we received…

“Scientific information about comprehension is very useful. All the trainers explained the concepts with in-depth knowledge. Very good illustrations. Excellent presentation. All the content presented is extremely child-friendly. Many congratulations to all! This initiative is very helpful for children from Municipal schools.” – Smt. Shubhangi Chavan, Education Officer, Pune Municipal Corporation’s School Board

“Comprehension concepts explained very effectively. Presentation was very relevant to the subject. Wow! Such complicated subject… displayed and explained with lot of ease.  Science, Mathematics, languages, emotions, geography… All the material presented will surely help development of learning experience for children.” – Shirish Kulkarni, Professional Trainer

(Reported by:- Rutuja, Vandana, Neha – Parivartan Training Center, Door Step School, Pune; Translated by:- Gauri Joglekar, Volunteer)

परिवर्तन प्रशिक्षण केंद्राचे वार्षिक प्रदर्शन – आकलन २०१७

‘डोअर स्टेप स्कूल’अंतर्गत चालणा-या ‘परिवर्तन प्रशिक्षण केंद्रा’त दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. ‘आकलन’ या संकल्पनेवर आधारीत हे प्रदर्शन दिनांक १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०१७ दरम्यान कुमठेकर रोड, पुणे येथील अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये भरवण्यात आले. प्रदर्शनाचे यंदाचे हे सातवे वर्ष होते. गेल्या वर्षी ‘बहुविध बुद्धिमत्ता’ या विषयावर प्रदर्शन भरवण्यात आले होते.

शिकणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बुद्धिमत्तेचा आणि आकलनचा सहसंबंध असतो, या उद्देशाला धरुन यंदाच्या प्रदर्शन-विषयाची मांडणी करण्यात आली. शालेय शिक्षण पद्धतीमध्ये मुलांचे आकलन कसे होईल किंवा कोणत्या शैक्षणिक साधन- साहित्याच्या माध्यमातून मुलांचे आकलन अधिक चांगले, होईल याचा विचार करुन विविध विषयातून संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

आकलन ही मेंदू-आधारीत व्यापक संकल्पना असल्याने, प्रदर्शनामध्ये त्याची मांडणी थिअरी व साधने यांच्या स्वरुपात करण्यात आली. या आकलनाच्या थिअरीमध्ये आकलन शास्त्राच्या जन्माअगोदरच्या इतिहासापासून ते ‘आकलन-आधारीत शिकणे आनंदाचे कसे होईल?’ इथपर्यंतचे मुद्दे विविध उदाहरणे, आकृत्या, चित्रांच्या माध्यमातून, तसेच आकलन आधारीत कवितांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला. आकलन आधारीत साधनांची मांडणी करण्यासाठी विविध शालेय विषय जसे की, भाषा, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रे, व विज्ञान यांवर आधारीत शैक्षणिक साधने मुलांच्या वयोगटाचा विचार करुन बनविण्यात आली. तसेच मुलांच्या आकलनप्रक्रियेवर ‘भावना’ या घटकाचाही परिणाम होत असल्याने याचाही समावेश शैक्षणिक साधने बनविण्यासाठी केला होता.

सदरचे प्रदर्शन बघण्यासाठी ‘डोअर स्टेप स्कूल’चे सर्व प्रकल्पांमधील कर्मचारी कार्यकर्ते, इतर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तसेच मनपा शिक्षण मंडळातील सदस्य, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आणि खाजगी शाळेतील शिक्षकांनी व मुलांनी या प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शनाच्या या १० दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण १,२६० लोकांनी प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या लोकांकडून मिळालेले लेखी व तोंडी अभिप्राय यांचा आढावा घेतला असता, “एकंदरच ‘आकलन’ या विषयाची मांडणी तक्ते व साधने यांच्या माध्यमातून सोप्या व साध्या भाषेत अतिशय चांगल्या प्रकारे केली आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केलेले दिसते. ‘परिवर्तन’ने सादर केलेला ‘आकलन’ हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता आला याचे आम्हाला समाधान आहे.

प्रदर्शनास मिळालेल्या अभिप्रायापैकी काही निवडक अभिप्राय –

“आकलनासंबंधी शास्त्रीय माहिती खूप उपयुक्त आहे. सर्व ट्रेनरची माहिती देण्याची पद्धत अभ्यासपूर्ण आहे. स्पष्टीकरण उत्तम. विषय मांडणी उत्तम. सर्व साहित्य चाइल्ड-फ्रेंडली आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त उपक्रम आहे.” – श्रीमती शुभांगी चव्हाण, शिक्षणप्रमुख, पुणे मनपा शिक्षण मंडळ

“आकलन या संदर्भातील माहिती, मांडणी अतिशय प्रभावी आणि सुसंगत. इतका अवघड विषय इतक्या सुंदर पद्धतीने मांडलाय, की व्वा….! सायन्स, गणित, भाषा, भावना, भूगोल इथली साहित्य अतिशय कष्टपूर्वक मुलांच्या विकासाला खात्रीने मदत करतील असे !” – श्री. शिरीष कुलकर्णी, व्यावसायिक प्रशिक्षक

(अहवालः- रुतुजा, वंदना, नेहा – परिवर्तन प्रशिक्षण केंद्र, डोअर स्टेप स्कूल, पुणे)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *