Surveys, Parent Meetings, and School Enrollments

For several years, Door Step School has been working for education of children from migrant and marginalised communities in Pune. As a part of these efforts, the Every Child Counts (ECC) campaign was launched to ensure every child between the age of 6 and 14 years gets its right to free elementary education under Right to Education Act, 2009. While conducting the ECC campaign activities like survey and admissions, the role of parents in their children’s education was observed to be minimal. Hence another project called Parents’ Participation in Child’s Education (PPCE) was started to increase awareness among parents. Through this project, we work with parents for a longer duration, educating and empowering them about various aspects of Right to Education Act and schooling of their children.

The month of May saw the surveys starting in full swing, to identify out-of-school children across the city. In the month of June, these surveys were followed by meetings with parents and enrollment of children in nearby PMC/PCMC/ZP schools.

By the month of June 2016, our Every Child Counts field team surveyed more than 1,000 locations (construction sites, brick kilns, temporary slums, etc.) across Pune, Pimpri-Chinchwad, and other fast-developing outer areas. Around 1,100 children were found in the survey, out of which 600 have now been enrolled in nearby government schools. About 50 volunteers from various corporates and institutes in Pune contributed close to 200 man-hours in the campaign activities. Similarly, 200 parents were interviewed under Parents’ Participation project, with help of 20 volunteers.

The survey, parent meetings, and school admissions will continue in coming months and more volunteers are required for reaching out to more out-of-school children living in the city. Please share these updates with your contacts and help us get more volunteers for ECC and PPCE activities. Thanks!

 

 

गेल्या अनेक वर्षांपासून, पुण्यातील स्थलांतरित व वंचित कुटुंबांमधील मुलांच्या शिक्षणासाठी ‘डोअर स्टेप स्कूल’ काम करीत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून, शिक्षण हक्क कायदा २००९ (आर.टी.ई.) अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुला-मुलीस त्यांचा मोफत प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी ‘एक एक मूल मोलाचे’ (एव्हरी चाइल्ड काउंट्स – इसीसी) हे अभियान सुरु करण्यात आले. या अभियानांतर्गत शहरातील व शहराबाहेरील वस्त्यांचे सर्वेक्षण व त्यातून मिळणा-या शालाबाह्य मुलांचे शाळाप्रवेश करीत असताना, आपल्या मुलांच्या शिक्षणामधे या पालकांचा सहभाग अतिशय कमी असल्याचे दिसून आले. अशा पालकांचे शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ‘मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग’ (पेरेंट्स पार्टिसिपेशन इन चाइल्ड्स एज्युकेशन – पीपीसीई) हा वेगळा प्रकल्प सुरु करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत आम्ही पालकांसोबत दीर्घकाळ काम करुन त्यांना शिक्षणहक्क कायदा व आपल्या मुलांचे शालेय शिक्षण याबाबत सजग व सक्षम बनविण्याचा प्रयत्न करतो.

यंदाच्या मे महिन्यामधे शहरात व शहराभोवती नव्याने विकसित होणा-या सर्व भागांमधे मोठ्या प्रमाणावर शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले. त्यापाठोपाठ जून महिन्यामधे, सर्वेक्षण केलेल्या ठिकाणी पालक सभा आयोजित करण्यात आल्या, तसेच मुलांना जवळच्या पुणे अथवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमधे प्रवेश मिळवून देण्याचे काम करण्यात आले.

जून महिन्यापर्यंत आमच्या ‘एव्हरी चाइल्ड काउंट्स’ अभियानातील कार्यकर्त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच सभोवतालच्या भागातील (बांधकाम साईट, वीटभट्ट्या, तात्पुरत्या वस्त्या, अशा) सुमारे १,००० हून अधिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात जवळपास १,१०० मुलांची माहिती गोळा करण्यात आली व आतापर्यंत त्यापैकी ६०० मुलांना जवळच्या सरकारी शाळांमधे प्रवेशही मिळवून देण्यात आला. पुण्यातील विविध कॉर्पोरेट कंपन्या व संस्थांमधील सुमारे ५० व्हॉलंटीयरनी इसीसीच्या निरनिराळ्या कामांमधे जवळपास २०० एकत्रित तासांएवढे योगदान दिले. त्याचप्रमाणे, पालक सहभाग प्रकल्पांतर्गत आणखी २० व्हॉलंटीयरच्या मदतीने २०० पालकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली.

शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, पालकांसोबत भेटी, आणि शाळाप्रवेशाची प्रक्रिया यापुढेही चालूच राहील. आपल्या आजूबाजूला राहणा-या आणखी शालाबाह्य मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून ब-याच व्हॉलंटीयरच्या सहभागाची आवश्यकता आहे. कृपया ही माहिती आपल्या संपर्कातील व्यक्तींना पाठविल्यास, इसीसी व पीपीसीई या प्रकल्पांसाठी व्हॉलंटीयर मिळविण्यात आम्हाला मदत होईल. धन्यवाद!