Door Step School

Book Fair at Dighi School

A Book Fair was organized on 28/12/2016 at two schools in Dighi Gaon (Pimpri-Chinchwad) under Door Step School’s Reading Classes Programme. This Book Fair at Chhatrapati Shahu Maharaj Primary School, Dighi Gaon included –

* Book Stall,
* Newspapers, Magazines, and all types of Books in other languages,
* Experiments Stall,
* Creative Activities like Finger Impression Art Work, Making Paper Animals, Collage, Puppet Show,
* Teaching Tools Stall, etc.

The Book Fair was inaugurated by Deputy Administrative Officer of Pimpri-Chinchwad School Board Mr. Parag Munde, Chairman of School Management Committee Mrs. Manda Walake, Principal of Dighi School Mr. Tukaram Langi.

490 children and 14 teachers from this school along with 4 teachers and 10 students from other schools, and 22 Book-Fairies, 60 parents participated in the Book-Fair.

Children were busy reading books at the Book Stall. They also noted down names of various newspapers. Questions were asked during experiments shown to them. Some of them even tried few experiments on their own. Active participation was seen at Creative Activity Stall. Children watched 6 stories through Puppet Show. Parents were also seen visiting the stalls with interest and curiosity.

The School Principal mentioned that this Book Fair provided an opportunity to the children to witness and learn many new things. For the first time, children watched stories through Puppets. They had also never seen so many types of newspapers before.

(Reported by Sushma Ranawade, Area Co-ordinator, Door Step School)

‘डोअर स्टेप स्कूल’ वाचन संस्कार प्रकल्पाअंतर्गत दि. २८/१२/२०१६ रोजी पिंपरी चिंचवड भागातील दिघी गाव येथील २ शाळांमधे पुस्तक मेळाव्याचे आयोजन केले होते. छत्रपती शाहूमहाराज प्राथमिक विद्यालय, दिघी गाव येथील पुस्तक मेळाव्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते –

* पुस्तकांचा स्टॉल,
* इतर भाषांतील वर्तमानपत्रे,मासिके, व सर्व प्रकारची पुस्तके,
* प्रयोगाचे स्टॉल,
* सृजनशील कृतीमध्ये ठसेकाम, उंदीर बनविणे, कुत्रा बनविणे, कोलाज काम, पपेट शो,
* साधन साहित्य स्टॉल, इत्यादी.

या पुस्तक मेळाव्याचे उदघाटन पिंपरी चिंचवड शिक्षण मंडाळाचे उप-प्रशासकीय अधिकारी श्री. पराग मुंडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मंदा वाळके, दिघी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम लांगी यांच्या हस्ते झाले.

शाळेतील ४९० मुले व १४ शिक्षक, इतर शाळेतील ४ शिक्षक व १० मुले, २२ पुस्तकप-या, ६० पालक, या सर्वांनी पुस्तक मेळाव्यात सहभाग घेतला.

पुस्तकांच्या स्टाॅलवर मुलांनी पुस्तके वाचण्यास घेतली होती. तसेच विविध वर्तमानपत्रांची नावे मुलांनी वहीमधे लिहून घेतली. प्रयोग करताना मुले ‘असे कसे होत आहे?’ असे प्रश्न विचारत होती. काही प्रयोग स्वतः करुनही पाहत होती. हे स्टाॅल मुलांना खूप आवडले. सृजनशिल कृतीच्या स्टाॅलवर मुलांनी सक्रीय सहभाग घेतला. ‘पपेट शो’मध्ये मुलांनी वेगवेगळ्या ६ गोष्टी ऐकल्या व बघितल्या. पालकही यामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.

‘आमच्या मुलांना या मेळाव्यातून खूप काही शिकायला मिळाले, ‘पपेट’च्या माध्यमातून गोष्टी पहिल्यादांच ऐकल्या, वर्तमानपत्रे इतक्या प्रकारची असतात हेही मुलांना आजच समजले,’ असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

(अहवाल – सुषमा रानावडे, विभाग समन्वयक, डोअर स्टेप स्कूल यांचेकडून)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *