Door Step School

वाचन प्रेरणा दिन – २०१६

भारताचे माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस (दि. १५ ऑक्टोबर) ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने यावर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड येथील शाळांमधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व शाळांमधून मुलांनीच लिहिलेल्या ‘डोअर स्टेप स्कूल’च्या ‘वन पेज स्टोरी’ उपक्रमातील गोष्टींचे सामूहिक वाचन घेण्यात आले. या उपक्रमात ज्या विद्यार्थ्यांच्या गोष्टींची निवड झाली होती त्या विद्यार्थ्यांचे ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आपापल्या शाळांमधे कौतुक करण्यात आले. मुलांना वाचण्यासाठी प्रेरक वातावरण निर्माण व्हावे म्हणून गोष्टीच्या पुस्तकांची वर्गांमधून मांडणी करण्यात आली होती. काही शाळांमधे विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र बसून पुस्तकांचे वाचन केले. मुलांनी ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त विविध घोषवाक्ये तयार केली व म्हटली. वाचनाविषयी प्रेरणा देणारी भित्तीपत्रके शाळांमधे प्रदर्शित करण्यात आली. यावेळी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अल्पचरित्राचेही सामूहिक वाचन करण्यात आले. ‘डोअर स्टेप स्कूल’च्या पुस्तक प-यांसोबतच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, तसेच सहाय्यक शिक्षणाधिकारी, मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, असे मान्यवरही या उपक्रमांमधे सहभागी झाले. मुलांमधे वाचनाविषयी गोडी निर्माण व्हावी या हेतुने आयोजित केलेल्या या ‘वाचन प्रेरणा दिना’स सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *